चारा घोटाळ्यात 36 कोटी 50 लाखाच्या रकमा गायब

संग्रहित फोटो

मुदत संपूनही अद्याप खुलासा नाही
तालुक्‍यातील तहसीलदारांना याप्रकरणी विलंब केल्यामुळे जबाबदार का धरण्यात येऊ अशी विचारणा करण्यात आली. मात्र, खुलासा, कारवाईची मुदत संपूनही संबंधितांनी अद्याप खुलासा केला नाही, असा स्पष्ट आरोप गायके यांनी या पत्रात केला आहे.

काका पाटील गायके : लोकशाही दिनात अर्ज करूनही दखल नाही

नगर – 2012 ते 2014 मध्ये सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यात 200 कोटीच्या पुढे चारा छावणी घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात बोगस पशुधन व कोट्यवधी रुपयांचा ताळमेळ नसणे, तसेच 36 कोटी 50 लाख रुपयांचा रकमा गायब असणे, असे अनेक भ्रष्टाचार झाल्याचे नमूद करताना याबाबत आपण शासनाला वेळोवेळी कागदपत्रांचे पुरावे सादर करुनही या कागदपत्रांच्या आधारे चारा छावणी चालकांविरुध्द कारवाई करण्यात आली नाही. आता चारा छावणी चालकांवर 188 कलमानुसार कारवाई करण्यात येत आहे. ती वस्तुस्थितीला धरुन नाही. चारा छावण्यांवर नियंत्रण व कामकाज करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी होते. तेही प्रथमत: दोषी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते काका पाटील बाजीराव गायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अर्जाद्वारे कळविले आहे.

गायके यांनी म्हटले अर्जात म्हटले आहे की, चारा छावणी 2012 ते 2014 मधील चारा छावण्यांवर 188 कलमानुसार होत असलेली कारवाई योग्य नसून, याबाबत चारा छावणी घोटाळ्याच्या तक्रारी आपण वेळोवेळी केल्या. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे चारा छावणीचालक व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे, या आशयाचा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

गायके यांनी 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले पत्र जिल्हा प्रशासनास सुपूर्द केले आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री, महसूलमंत्री, गृहविभागाचे प्रधान सचिव, पशुसंवर्धनमंत्री आणि विभागीय आयुक्‍तांना पाठविल्याचे पत्रात नमूद केले आहे. तत्कालीन काळात पशुधनाची दाखविलेली संख्या बोगस असून याबाबत लोकशाही दिनात अर्ज करुनही तक्रारीची दखल घेतली नसल्याचे गायके यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)