चारा उत्पादनाबाबत शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा – जलसंपदा तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी झाल्यामुळे बुडीताखालील जमिनी मोकळ्या व उघड्या पडलेल्या जमिनी वैरण पिकांच्या लागवडीकरीता उपयोगात आणण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी दिली.

अशा जमिनी चारा पिकांचे लागवडीकरीता शेतकऱ्यांना टंचाई हंगाम निवारणासाठी चारा पिकांचे उत्पादन घेण्यासाठी देण्यात येणार आहे. इच्छुक शेतकरी, पशुपालक, सहकारी संस्थांनी पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे 6 डिसेंबर पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केले आहे.

-Ads-

पशुपालक, शेतकरी लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)