चारही सल्लागारांच्या निविदा रद्द

– महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद नवीन इमारत बंधणी

– जानेवारीमध्ये फेरनिविदा मागविणार

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. या कामाच्या नियोजनासाठी दाखल केलेल्या चारही सल्लागारांच्या निविदा अटी व शर्तीत बसत नसल्याने त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता जानेवारीमध्ये सल्लागाराच्या नेमणुकीसाठी ऑनलाइन फेरनिविदा मागविण्यात येणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षा परिषदेची कार्यालये जूनी झालेली आहेत. त्यांची दूरवस्थाही झाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामकाज करताना मोठी कसरत करावी लागते. डागडूजी करून कार्यालयातील कामकाज चालू आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन अखेर परीक्षा परिषदेने स्वत:च्या मालकीच्या एक एकर जागेवर नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. या इमारतीसाठी एकूण 70 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

इमारत बांधकामाचे सर्व नियोजन व आराखडे तयार करण्यासाठी, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, देखरेख करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार नेमण्यात येणार असून यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यासाठी सल्लागारांकडून ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या होत्या. दोनवेळा मुदतवाढ देऊनही निविदा दाखल करण्यासाठी सल्लागारांकडून फारसा प्रतिसादच मिळाला नाही. केवळ चारच सल्लागारांनी निविदा दाखल केल्या. यातही नामांकित एकही सल्लागार नसल्याची माहिती मिळाली आहे.

सल्लागारांची नावे परिषदेकडून गुप्तच
या दाखल झालेल्या निविदांची तांत्रिक छाननी करण्यात आली. त्यांनी निविदेबरोबर ऑनलाइन भरलेली सर्व कागदपत्रे तपासण्यात आली. त्याबाबतचा अहवाल तयार करून तो परीक्षा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या वित्त व कार्यकारी समितीच्या बैठकीत निर्णयासाठी ठेवण्यात आला होता. चारही सल्लागार निविदांच्या अटी व शर्तीची परिपूर्ण पूर्तता करण्यात नापास ठरविण्यात आलेले आहेत.

कामाचा पुरेसा अनुभव नसणे, आवश्‍यक ती आर्थिक उलाढाल नसणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे, कुशल मनुष्यबळ उपलब्ध नसणे यासारख्या विविध कारणांमुळे चारही सल्लागारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. सल्लागारांची नावे परिषदेकडून अखेरपर्यंत गुप्तच ठेवण्यात आली आहेत. सल्लागारांच्या नावाची माहिती देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून सतत टाळाटाळ करण्यात आली आहे. आता सल्लागाराच्या नेमणुकीसाठी फेरनिविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय परीक्षा परिषदेकडून घेण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)