चारभिंतीलाही कचऱ्याचा वेढा

सातारा ः चार भिंतीकडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी व मद्यांच्या बाटल्यांचा पडलेला कचरा. (छाया ः गुरुनाथ जाधव)

मोकाट जनावरांचा वावर वाढला,अपघातही वाढले

सातारा, दि. 22 (प्रतिनिधी)- ऐतिहासिक चारभिंत परिसराकडे जाण्याच्या रसत्यावरती दुतर्फा कचऱ्याचे ढिग साठल्याचे चित्र दिसत आहे.एकीकडे स्वच्छ सातारा सुंदर आमचा सातारा असा पालिका कर्मचाऱ्यांच्या तसेच आधिकाऱ्यांच्या रिंगटोन आजही ऐकायला मिळत असताना दुसरीकडे कचऱ्याचे ढिग दिसत आहेत.
आरोग्याचे तोरण बांधू, काढू स्वच्छतेची रांगोळी असे. क्रांतीच्या मातीतून सूर नवा जन्मला. सुंदर सातारा स्वच्छ हा सातारा असे संदेश रोज फिरणाऱ्या घंटागाड्यावरऐकायला मिळतात मात्र कित्येक ठिकाणी हा कचरा उचललाच जात नसल्याचे चित्र एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्यावरतीच तो टाकल्याचे दिसत आहे. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन कायद्याची पायमल्ली होत असताना सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही पध्दतीची कारवाई होत नसल्यानेच ऐतिहासिक चारभिंत्ती परिसराकडे जाण्याच्या रसत्यावर दुतर्फा कचऱ्याचे ढिग साठल्याने किल्ले अजिंक्‍यतारा तसेच चारभिंत्ती कडे जाताना कचऱ्यातूनच प्रवास करावा लागत आहे.
या कचऱ्यामुळे मोकाट जनावरांचा या ठिकाणी वावर वाढला आहे. त्यांच्यामुळे अनेक वेळा अपघात घडून नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या उंचावरील ठिकाणी येउन साताराचे विहंगम दृष्य पहायचे कि कचरा असा प्रश्न सातारावासीयांना पडला आहे. या परिसराकडे येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छ सातारा सुंदर सातारा ऐवजी अस्वच्छ सातारा असेच चित्र दाखवले जात आहे. यामध्ये या ठिकाणी कचरा नेमकं कोण टाकते. याचा शोध घेवून संबधितांवरती कारवाई करणे आवश्‍यक बनले आहे. तसेच हा कचरा घंटागाड्याच्या द्वारे गोळा केला जातो का अथवा नसेल तर तो करणे आवश्‍यक आहे. या रसत्यावरती काही वृक्षप्रेमींनी झाडे लावली आहेत. सातारच्या सौंदर्यामध्ये भविष्यात त्यामुळे भर पडणार आहे. मात्र सध्या त्याच झाडांना प्लॅस्टिकच्या पिशव्या व कचर्याचा विळखा पडला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)