चारचाकी चोरीसह घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक

पुणे- चारचाकी गाड्या चोरीसह घरफोड्या करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. पुणे शहर आणि ग्रामीण मधील सहा गुन्हे उघडकीस आणून 15 लाख 11 हजार 258 रूपयांचा ऐवज जप्त केला.

रफिक उमर जमादार ( रा. विद्यानगर, चिंचवड), करण कुमार जाधव ( रा. आळंदी) आणि निलेश सुनिल पवार ( रा. भोसरी) असे अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाचे कर्मचारी गस्तीवर असताना कर्मचारी हजरत पठाण यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य मिळाले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, निगडी पोलीस ठाण्यातील बोलेरो जीप चोरी, संगणकाचे साहित्य चोरी, कॉपर, ब्रास आणि ऍल्युमिनीयमचे रॉड चोरी, टाटा सफारी चोरी असे तीन गुन्हे उघडकीस आले.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील स्विफ्ट डिझायर चोरी, लोणीकाळभोरी येथील स्टिलचे इंटस्ट्रीयल जॉब आणि चाकण येथील वाहनांच्या बॅटऱ्या चोरी असे गुन्हे उघडकीस आले. वरिष्ठ निरीक्षक रघुनाथ फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उत्तम बदगुडे, नागेश भोसले, कर्मचारी हजरत पठाण, अब्दुलकरीम सय्यद, तुकाराम नाळे, गणेश साळुंखे, संभाजी गायकवाड, हनुमंत बोराटे, राजेंद्र वांबुरे, जितेंद्र तुपे, सुहास कदम, सागर घोरपडे, विशाल शिर्के यांनी ही कारवाई केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)