चारचाकीतील लॅपटॉपसह सोन्याचे गंठण चोरट्यांनी लांबविले

लोणी काळभोर- वाहनातील व्यक्ती आपल्या सहाय्यकासह विकसकाची जमीन मोजणी करण्यासाठी गेले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी चारचाकीच्या दरवाज्याची काच तोडून लॅपटॉप आणि तिन तोळे वजणाचे सोन्याचे गंठण असा एकूण 68 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरूवारी (दि.11) सकाळी 11.30 च्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी सुभाष अनंत गाढवे (वय 47, रा. गाढवे मळा, थेऊर फाटा, ता. हवेली) यांनी तक्रार दाखल केली आहे. गाढवे हे जमीन मोजणीचे काम करतात. याकामी त्यांना गेले सात वर्षेपासून राहुल भालचंद्र आगलावे (वय 27, सध्या रा. आशिर्वाद बिल्डींग, पोलीस दूरक्षेत्राचे मागे, ऊरूळी कांचन, मूळ रा. बावी, ता. बार्शी, जि. पुणे) हे सहाय्यक म्हणून मदत करतात.
याबाबत पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी (दि.10) ताम्हाणेवस्ती, थेऊर फाटा येथे दिलीप शिवाजी ऊंद्रे यांच्या जमीन मोजणीचे काम असल्याने गाढवे आणि आगलावे हे दोघे गाढवे यांच्या मारूती स्विफ्ट (एमएच 12 एमबी 3492) मधून सकाळी 10. 15च्या सुमारास आले होते. सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या करण ढाब्याचे समोर असलेल्या एका झाडाखाली त्यांनी चारचाकी लावली. यातील मागील आसणावर गाढवे यांचा लॅपटॉप आणि आगलावे यांच्या बॅगमध्ये जेवणाचा डबा तसेच त्यांच्या पत्नीचे तीन तोळे वजणाचे सोन्याचे गंठण होते.
चारचाकी लॉक करून मशीन घेऊन ते दोघे ऊंद्रे यांची गट क्रमांक 285 मोजणी करण्यासाठी गेले. मोजणीचे काम संपवून 11.30च्या सुमारास ते पुन्हा चारचाकीजवळ आले. त्यावेळी त्यांना वाहनाच्या डाव्या बाजूला असलेल्या दरवाज्याची काच तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत पाहणी केली असता मागच्या आसणावर ठेवलेला लॅपटॉप आणि आगलावे यांची जेवणाचा डबा, सोन्याचे गंठण ठेवलेली बॅग मिळून आली नाही. म्हणून त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाऊन 8 हजार रुपये किंमतीचा कॉम्पॅक कंपनीचा लॅपटॉप आणि 60 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि 200 रूपये किंमतीची बॅग असा एकूण 68 हजार 200 रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असल्याची फिर्याद दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)