चारचाकीच्या धडकेत डोर्लेवाडीतील एकाचा मृत्यू

भिगवण- पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या इनोव्हा कारने धडक दिल्याने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात भिगवण शहरात नंदादीप हार्डवेअरसमोर सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान घडला. किसान संभाजी गंदारे (वय 75, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती), असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत भिगवण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून
पुणे बाजूकडून सोलापूर बाजूकडे भरधाव वेगाने जाणारी इनोव्हा कार (क्रमांक एमएच.बीसी 4803) ही पायी जाणाऱ्या रस्ता ओलांडणाऱ्या रस्ता ज्येष्ठ नागरिकाला समोरून बाजूस वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्षित करून जोरदार धडक दिली. यामध्ये डोक्‍यास व हातापायास गंभीर दुखापत होऊन गंदारे यांचा जागीच मृत्यू झाला. चालक दिनेश काशीराम बेलोसे (रा. टेंभीपाडा, भांडूप, मुंबई) यास पोलिसांनी तत्काळ अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)