चारचाकींसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर समान ठेवावेत का?

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
नवी दिल्ली – चारचाकी वाहनांसाठी आणि खासगी कारसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर समान ठेवले जाऊ शकतात का, अशी विचारणा आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केली. डिझेल वाहनांमुळे होणारे प्रदूषण हा चिंतेचा विषय असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाकडून सांगण्यात आल्यानंतर न्यायालयाने संबंधित विचारणा केली.
दिल्लीतील हवा प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या याचिकेवर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

यावेळी विविध बाजूंकडून युक्तिवाद करणाऱ्या वकिलांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. यावेळी न्यायालयाने डिझेल वाहनांच्या वापरावर बंदी घालण्याचा विचार जर्मनी करत असल्याच्या बातम्यांचाही संदर्भ दिला. वाहन उत्पादकांची बाजू मांडणाऱ्या वकिलाने बीएस-सहा दर्जाचे इंधन एप्रिल 2019 पासून दिल्लीत उपलब्ध होणार असल्याने डिझेल वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली.

ऑगस्ट 2016 मध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीचे प्रमाण 47.5 टक्के इतके होते. ते आता 23 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यावर न्यायालयाने इलेक्‍ट्रीक वाहनांच्या वापराविषयी विचारले. त्यावर देशाच्या विविध भागांत इलेक्‍ट्रीक वाहनांचा वापर सुरू झाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 23 जुलैला होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)