चायना मांजा विकणाऱ्यांवर गुन्हेदाखल करा; रिपाइंच्या वतीनेशहर पोलिसांना निवेदन

श्रीरामपूर – शहरात चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर व चायना मांजानेपतंग उडवणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपाइंच्यावतीने शहर पोलीस ठाण्याचेउपनिरीक्षक श्रीराम शिंदेव मोहन भोसले यांच्याकडे करण्यात आली.
जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात म्हटलेआहे की, पतंगाच्या चायना मांजामुळे शेकडो पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. माणसेदेखील चायना मांजा गळ्यात अडकल्याने गळा चिरल्यानेजखमी होतात. यामुळेदुचाकी, सायकलवरून पडण्याच्या घटनाही घडतात. चायना मांजा जरी स्वस्त असला तरी तो बनवण्यासाठी लागणारे नायलॉन दोर, प्लॅस्टिक, काचेचा भुगा, लोखंडाचा भुगा तसेच चिकटवण्यासाठी विषारी केमिकल, आदी घातक पदार्थ वापरले जातात. चायना मांजा तुटण्यासाठी कठीण असल्याने पक्ष्यांच्या पंखात अडकला की पक्ष्याला चोचीने तोडता येत नाही. कित्येकदा विजेच्या तारांमध्ये अडकलेल्या मांज्यांच्या दोऱ्यांमध्ये अडकून पक्ष्यांचा तडफडून मृत्यू होतो. त्यामुळे चायना मांजा विक्री करणाऱ्यांवर व चायना मांज्याने पतंग उडवणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन देताना रिपाइं तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ, शहराध्यक्ष राजू गायकवाड, तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल बार्से, राजू मगर, प्रदीप कदम, पप्पू दिवेकर, किरण कटके, सुमेध पडवळ, अश्‍विजीत त्रिभुवन, नाना बोरकर, रावसाहेब आल्हाट, रावसाहेब आल्हाट, किरण पवार, रवी रुपटक्के, प्रकाश पवार, राहुल बागुल, अमोल गणराज, राहुल पवार, रवी गायकवाड, रोहित कोळगे, विकास जगधने,अक्षय कुमावत, दीपक शिंदे, सनी बिऱ्हाडे, शिवाजी शिंदे, ह्षीकेश भोसले, दत्तात्रय भोसले, विशाल सुरठकर, दादू बनकर, मयूर सहानी, किशोर ठोकळ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)