चाबहार बंदराच्या विकासाबाबत भारताकडून दुर्लक्ष

इराणने केली भारतावर टीका
नवी दिल्ली – इराणमधील चाबहार बंदराच्या विकासात भारताकडून मोठी गुंतवणुक केली जाईल असे आश्‍वासन भारताकडून देण्यात आले होते पण त्याकडे भारताचे साफ दुर्लक्ष झाले आहे. भारताने दिलेले हे आश्‍वासन फोल ठरल्याने इराणने भारतावर टीका केली आहे. अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आमच्याकडून घेतल्या जाणाऱ्या इंधनात कपात केली तरी भारताला आमच्याकडून देण्यात आलेला विशष दर्जाही काढून घेण्याचा इशारा इराणने दिला आहे.

इराणचे भारतातील उपराजदूत मसोद रेझवानियन रहाघी यांनी सांगितले की भारताने चाबहार बंदराच्या विकासात सुरूवातील मोठेच स्वारस्य दाखवले होते. त्यात मोठी गुंतवणूक करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले होते त्याचा भारतालाही लाभ होणार होता पण नंतर मात्र भारताने शब्द फिरवला व तेथील गुंतवणुकीकडे पाठ फिरवली आहे.

जागतिक राजकारणातील संधी आणि भारताशी असलेले संबंध या विषयावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पाकिस्तानला टाळून मध्य अशियायी देशांशी व्यापार करण्यासाठी चाबहार बंदर हे भारतासाठी व्युवाहत्मदृष्ट्या महत्वाचे आहे. त्यामुळे भारताने हे बंदर विकसित करण्यात स्वारस्य दाखवले पण तेथे अपेक्षित गुंतवणूकच अद्याप केलेली नाही त्यामुळे इराणने भारतावर टीका केली आहे.

इराण, भारत आणि अफगाणिस्तान या देशांच्यावतीने संयुक्तपणे या बंदराचा विकास केला जाणे अपेक्षित होते त्यासाठी सन 2016 रोजी करारही करण्यात आला आहे पण भारताकडुन पुढील काहींच हालचाल झाली नाही. चाबहार बंदराच्या विकासात भारताने दाखवलेल्या स्वारस्यावरून मोदी सरकारच्या चाणाक्षपणाचे देशभर कौतुक केले गेले होते व भाजपनेही त्याचे मोठे भांडवल चालवले होते. पण प्रत्यक्ष इराणी प्रतिनिधीनीचे भारताच्या दुर्लक्षाची बाब निदर्शनाला आणून दिल्याने ती मोदी सरकारसाठी मोठीच नाचक्की ठरली आहे.

दरम्यान अमेरिका किंवा अन्य आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकुन भारताने इराणकडून तेल आयातीचे प्रमाण कमी केल्यास त्याचेही गंभीर परिणाम भारताला भोगावे लागतील असा इशाराही इराणच्या या प्रतिनिधीने आज दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)