चाफळमध्ये आजी-माजी सरपंचाकडून स्वच्छता मोहिम

चाफळ – चाफळ, ता. पाटण येथील ग्रामपंचायतीच्या आजी-माजी सरपंच संध्याराणी पाटील व अलका पाटील यांच्यासह उपसरपंच उमेश पवार व कर्मचाऱ्यांनी स्वत: हातात झाडू घेवून गांव व परिसर प्लास्टीकमुक्त करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला.

चाफळला सामाजिक व ऐतिहासिक वारसा आहे. या गावच्या ग्रामपंचायतीने यापूर्वी शासनाचे निर्मलग्राम, तंटामुक्ती, पर्यावरणसह संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार पटकाविले आहेत. आ. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये अनेक विकासाभिमुख कामे मार्गी लागली आहेत. काही दिवसांपूर्वी येथील नदीकाठावरील जलपर्णी काढून नदी परिसराला नवी झळाली दिली आहे. बसस्थानक ते श्रीराम मंदीर परिसरातील रामपेठ व नदीकाठी टाकलेला कचरा, प्लास्टीक पिशव्या पदाधिकाऱ्यांनी गोळा करीत आपला गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उपसरपंच उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वच्छ भारत अभियानांतर्गत गाव व परिसरात स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत सरपंच अलका पाटील, उपसरपंच उमेश पवार, माजी सरपंच संध्याराणी पाटील, ग्रामसेवक राजेंद्र चोरगे, कर्मचारी हणमंत गुरव, सतिश पाटसुते, अक्षय वैराट, सविता रकटे यांनी स्वत: हातात झाडू व रिकामी पोती घेवून गावातील टाकाऊ कचरा गोळा केला.

चाफळ बरोबरच विभागातील इतर ग्रामपंचायतींनी प्लास्टीक मुक्तीसाठी गावस्तरावर प्रयत्न केल्यास निश्‍चीतच संपूर्ण विभाग चकाचक होईल, यासाठी सामुहिक प्रयत्नांची खरी गरज आहे. यासाठी विभागातील ग्रामपंचायतींनी अशाप्रकारचे प्रयत्न करावेत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)