चादर ट्रेक यशस्वी करणाऱ्यांचा गौरव

लोणी काळभोर -यंदाच्या हिवाळ्यात हिमालयातील अत्यंत अवघड असा चादर ट्रेक फक्त तुमच्या शिवसह्याद्री प्रतिष्ठानने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात असे मत ट्रायमार्क ऍडव्हेंचर या गिर्यारोहक संस्थेचे प्रमुख नितीन जोशी यांनी व्यक्त केले.
थेऊर फाटा, कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील शिव सह्याद्री प्रतिष्ठानच्या 21 सदस्यांनी हिमालयातील लेह-लडाखमधील अतिशय अवघड असा चादर ट्रेक नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला. कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, पंडित झेंडे व नितीन काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती. यशस्वीरित्या ट्रेक पूर्ण करणाऱ्या सभासदांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या वेळी नितीन जोशी बोलत होते. ते पुढे म्हणाले यंदाच्या हिवाळ्यात हिमालयातील चादर ट्रेक करण्यासाठी बरेच गिर्यारोहक आले होते; परंतु नियोजनातील अभावामुळे नंतर आलेल्या गिर्यारोहकांना चादर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करता आला नाही. नंतरच्या गिर्यारोहकांना निसर्गानेही साथ दिली नाही. शिवसह्याद्री प्रतिष्ठानने नियोजनबद्ध काम केल्यामुळे तुम्ही ट्रेक पूर्ण करण्यात यशस्वी झाला. त्याबद्दल शिवसह्याद्री प्रतिष्ठान कौतुकास पात्र आहे. कारण हिमालयातील अकरा हजार फूट उंचीवर व उणे 32 अंश सेल्सिअस तापमानात, नदीचे पाणी गोठून झालेल्या बर्फाच्या चादरीवर चालत डोंगर चढणे सोपे नाही.
या वेळी बोलताना शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे प्रमुख व कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे म्हणाले, हिमालयातील चादर ट्रेक करणे हे खरेच खूप आव्हानात्मक होते. आमच्या बरोबर 28 वर्षाच्या तरुणापासून ते 68 वर्षांच्या डॉ. अविनाश मराठे अशा सर्व वयोगटातील सदस्यांचा समावेश होता. त्यामुळे अत्यंत काटेकोरपणे व काळजीपूर्वक नियोजन करण्यात आले होते. या नियोजनबद्ध कामामुळेच हा अत्यंत अवघड ट्रेक यशस्वीपणे पार पडला. सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे पाच दिवसांचा ट्रेक साडेतीन दिवसांत यशस्वीरित्या पूर्ण करता आला, अशी माहिती सचिन तुपे यांनी दिली. यावेळी डॉ. अविनाश मराठे, अमोल काळभोर यांनी या ट्रेकवेळी आलेले थरारक अनुभव सांगितले. पंडित झेंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)