‘चाचा चौधरी आणि मोदी’ पुस्तकावरून विरोधक संतप्त

आम्ही कधीच शिक्षणात राजकारण आणलं नाही – सुप्रिया सुळे

पुणे – राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून वाटप करण्यात येणाऱ्या अवांतर वाचनाच्या पुस्तकामध्ये चाचा चौधरी आणि मोदी या पुस्तकाचेही वाटप केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकाच्या या कृतीचा विरोध केला. अशा प्रकारे शिक्षणात राजकारण आणून आम्ही कधीच स्वत:ची जाहिरात केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत माहिती देताना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले, शासनाने 69 प्रकाशकांची पुस्तके अवांतर वाचनासाठी शाळांना पाठविली आहे. त्यामध्ये या पुस्तकाचा समावेश आहे. या पुस्तकांवर विद्याप्राधिकरणाचाही लोगो छापण्यात आला आहे. या एकूणच प्रकाराबाबत सुळे म्हणाल्या, इतकी वर्षे आमचे सरकार होते. परंतु आम्ही अशा प्रकारे कधीच शिक्षणात राजकारण आणले नाही. अशा प्रकारे पुस्तकांच्या माध्यमातून स्वत:ची जाहिरात करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकांना कितेक दिवस संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाही आणि दुसरीकडे मोठे होर्डिग लावायला सरकारकडे पैसे असतात हा विरोधाभास आहे.

स्वच्छतेचे दूत म्हणून गाडगेबाबांचे नाव घेता आले असते परंतु मोदींनी स्वत:चे क्रेडिट घेण्यासाठी हे सर्व केले आहे. शासनाने अशा प्रकारे पुस्तकांच्या माध्यमातून स्वच्छतेचे कितीही क्रेडिट घेतले तरीही स्वच्छतेची मूळ संकल्पना ही आर.आर.पाटील यांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानातून सुरू केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)