चाकूहल्ल्यातील जखमी युवकाचा मृत्यू

नातेवाईकांचा दिवसभर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

राहाता – प्रवरानगर येथेशुक्रवारी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचा मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
घटनेतील आरोपीस तात्काळ अटक करावी, त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत युवकाच्या नातेवाईकांनी दिवसभर लोणी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या दिला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आरोपीस चोवीस तासात अटक करण्याचे पोलिसांनी लेखी आश्‍वासन दिले.
त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
फिर्यादी कुणाल किशोर भोसले(वय 23, रा. प्रवरानगर) याचा चुलत भाऊ नरेंद्र राजेंद्र भोसले (वय 27, रा. प्रवरानगर) व त्याची भाची स्नेहा ऊर्फभोरी विलास चव्हाण लाला रंजन भोसले (रा. प्रवरानगर) याच्या घराजवळून जात होता. मागील वादाच्या कारणावरुन त्यांना रस्त्यात अडवून लाला याने शिविगाळ दमदाटी केली. यानंतर त्यानेनरेंद्रच्या पोटात चाकूने भोसकले. त्याने स्नेहा हिच्या हातावर चाकूने वार केले. कुणाल भोसले यांनी दिलेल्या फिर्यादी वरून लोणी पोलिसांनी लाला भोसले याच्याविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल केला. नरेंद्र व स्नेहावर लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता नरेंद्रचा मृत्यू झाला.
ही घटना त्याच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी आरोपीस अटक करावी या मागणीसाठी लोणी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिवसभर नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला , परंतु आरोपीस तात्काळ अटक केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही, मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.
आरोपीस चोवीस तासाच्या आत अटक न केल्यास पोलीस ठाण्यासमोर उपोषण करण्याचेनिवेदन रिपाइंच्या वतीने पोलीस उपाधीक्षक डॉ. सागर पाटील यांना देण्यात आले. आरोपीस चोवीस तासाच्या आत अटक करण्याचे पोलिसांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आंदोलन मागे घेण्यात आले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)