चाकूच्या धाकाने युवतीचे अपहरण

निर्जनस्थळी केला विनयभंग; सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

सातारा – दुकानात गेलेल्या युवतीच्या गळ्याला चाकू लावत,तिचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिडीत युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात तक्रार दिली आहे. सनी राजेंद्र अवघडे (रा.दत्तनगर,कोडोली सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. शाहूपुरीत बंदुकीचा धाक दाखवण्याच्या आणि त्यानंतर घडलेल्या या प्रकरामुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिडीत युवतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 2 रोजी ती काही साहित्य खरेदी करण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी संशयीताने दुचाकीवरून येत, युवतीला थांबवले. तू मला आवडतेस, माझ्यासोबत लग्न करणार का? असे म्हणत दुचाकीवर बसण्याचा आग्रह करू लागला. युवतीने त्याला विरोध केल्यानंतर संशयीताने खिशातून चाकू बाहेर काढत तिच्या गळ्याला लावला. तू गाडीवर बसली नाहीस,तर तुला मारून टाकणार अशी धमकी दिली.

घाबरलेली युवती गाडीवर बसल्यानंतर संशयीताने तिला जानाई माळाई डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निर्जनस्थळी नेले. तिथे तू माझ्यासोबत लग्न का करत नाहीस, म्हणत हा युवक तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करू लागला. दरम्यान युवतीने घडला प्रकार नातेवाईकांना सांगितल्यानंतर संशयीत आरोपीच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात अपहरण व विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलस हवालदार शेवाळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)