चाकूच्या धाकाने मोबाईल लंपास

चिंचवड – पादचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून त्याला मारहाण करून त्याचा मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना शनिवारी (दि.26) सकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवड मधील भोला हॉटेलजवळ घडली.

सूर्यभान यादव (वय-19, रा. चिखली, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यादव शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चिंचवड मधील भोला हॉटेलजवळून पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर दोन अज्ञात इसम आले. त्यांनी यादव यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या हातातील 8 हजार 500 रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)