चाकूच्या धाकाने मोटार पळवली

पिंपरी – मोटारीतून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मोटार चालकाला लुटून त्याची मोटार पळवून नेली. हा प्रकार नेहरूनगर येथील संतोषी माता चौकात रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.

आजिनाथ नागरगोजे (वय-32, रा. देहूगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-Ads-

नागरगोजे त्यांच्या वॅगन आर या मोटारीतून जात होते. संतोषी माता चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची मोटार अडविली. नागरगोजे यांनी मोटार थांबवली असता त्यांना चाकूचा धाक दाखवला. नागरगोजे यांच्या मोटारीतील एक मोबाईल, महत्त्वाची कागदपत्रे आणि मोटार असा एकूण 2 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)