चाकूचा धाक दाखून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सटाणा: सटाणा शहरातील अल्पवयीन मुलीवर चावडी चौकाजवळील राम मंदिराच्या पाठीमागच्या सुमसाम भागात नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला . या घटने मुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ निमार्ण झाली आहे. या पीडित मुलीचे (वय १५ ) वर्ष होते. मुलीच्या आईने सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी ऋषिकेश शरद सूर्यवंशी (वय २१) या तरुणाला अटक केली आहे.

सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी गावातील दुकानात किराणा घेण्यासाठी गेली असता, ऋषिकेशने अंधाराचा फायदा घेऊन तिला चाकू दाखवला. त्यानंतर पीडित मुलीला चापटीने मारहाण करीत आरडाओरड केल्यास मारून टाकेल, असा दम देऊन तिला राम मंदिराच्या मागे नेले. त्या नंतर तिचे तोंड दाबून अंगावरील कपडे फाडून तिचा बलात्कार केला. या प्रकरणी सटाणा पोलिसांनी पोस्को कायदासह बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, दुपारी अपर पोलिस अधीक्षक निलोत्पाल, सटाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी पाहणी केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)