पिंपरी – उबेर कार चालकाला चाकूचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कार घेऊन धूम ठोकली. ही घटना बुधवारी (दि. 23) मध्यरात्री एकच्या सुमारास पिंपरी येथे घडली.

सौरभ दिलीप देशमुख (वय 23, रा. हडपसर) याने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ उबेर कार (एम एच 12 / ए एस 4260) चालवतो. भूमकर चौकातून महिला प्रवाशांनी आज मध्यरात्री बाराच्या सुमारास सौरभची कार बूक केली. सौरभने महिला प्रवाशांना पिंपरीमधील स्वप्ननगरी वसाहतीजवळ सोडले. त्यानंतर तो कार वळवून जात असताना, अज्ञात तीन तरुणांनी त्याला अडविले. एकाने चाकूचा धाक दाखवला तर एकाने सौभरला कारच्या खाली ओढले व कारचा ताबा घेतला. दोघेजण कार घेऊन पसार झाले तर एकजण दुचाकीवरून गेला. सौरभने घटनेची माहिती 100 क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळविली. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)