चाकुच्या धाकाने महामार्गावर सव्वा कोटींची धाडसी लूट

पिंपरी – डिलीव्हरी बॉयला चाकुचा धाक दाखवत चोरट्यांनी तब्बल एक कोटी 35 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीच्या दागिने लुटून नेले. ही घटना हिंजवडी ठाण्याच्या हद्दीतील बालेवाडी स्टेडियमच्या गेटसमोर बुधवारी (दि.28) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. लुटलेले सोन्या-चांदीचे दागिने हे मुंबईहून पुण्यात आणले जात असताना ही घटना घडली. बेहराराम पुरोहित (वय 31 रा. टिंबर मार्केट, पुणे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेहराराम पुरोहितने मुंबईतुन सोन्याच्या दोन दुकानातून साडेचार किलो वजनाची सोन्याची 45 बिस्किटे घेतली. 45 बिस्किटांचे प्रत्येकी वजन 100 ग्रॅम आहे. या बेहरारामने त्याच्या मित्राकडून 60 हजार रुपये उसनेही घेतले होते. बेहराराम पुरोहित शेअर सुमोने रात्री साडे दहाच्या सुमारास बालेवाडी येथे उतरले. त्यानंतर त्याने बाणेरला जाण्यासाठी रिक्षा केली. याच रिक्षामधील तीन अनोळखी व्यक्तिंनी बेहरारामला चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडे असलेले सोने आणि 60 हजारांची रक्कम घेऊन तिथून पळ काढला.

बेहराराम हा मागील आठ वर्षांपासून समृद्धी ज्वेलर्समध्ये काम करत होता. दोन वर्षांपूर्वी नोकरी सोडून त्याने राजस्थानमध्ये व्यवसाय सुरु केला होता. मात्र या व्यवसायात त्याला अपयश आले होते. त्याचा पत्नीसोबत घटस्फोटही झाला. चार महिन्यांपासून तो पुन्हा एकदा समृद्धी ज्वेलर्समध्ये काम करू लागला होता. त्यानंतर मुंबईहुन सोन्या चांदीचे दागिने आणताना ही घटना घडली. बेहरारामने तातडीने ही घटना त्याच्या मालकाला सांगितली. तसेच गुरुवारी सकाळी त्याने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अरूण वाईकर तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)