चाकरमान्यांचा परतीचा प्रवास खडतर

पिंपरी – दिवाळीनिमित्त गावी गेलेल्या प्रवाशांना आता पुन्हा शहरात परतण्यासाठी अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. संबंधित एसटी स्थानकातून जादा बसचे नियोजनच नसल्याने, परतीचा प्रवास खडतर झाला आहे.
दिवाळीमित्त एसटी महामंडळाच्या वतीने गेली आठ दिवसांपासून नऊ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. याशिवाय प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत, गरजेनुसार जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. मात्र, दिवाळी संपल्यानंतर आता परतीच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. परतीचे नियोजन नसल्याने प्रवाशांना इतर खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागणार आहे. केवळ जादा बस सोडल्यास, त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे विविध ठिकाणी प्रवाशांना प्रवास करता यावा, याकरिता जादा बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. राज्यभरातून काम करण्यासाठी उद्योगनगरीत आलेल्या चाकरमान्यांची दिवाळी निमित्ताने आपल्या गावी जाण्यासाठी आगारात मोठी गर्दी केली होती. 3 नोव्हेंबर पासूनच्या जादा 9 गाड्यांना प्रवाशांचा सोईसाठी सोडण्यात आल्या. आगाराच्या एकूण 56 गाड्या सुरळीत सुरु झाल्या करण्यात आल्या असून, इतर डेपोतून येणाऱ्या अशा जवळपास 150 गाड्या विविध मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. नाशिक, अकोला, पणजी, लातूर, कोल्हापूर, उमरगा अशा जादा बसेस सुरु करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, दिवाळी संपल्यानंतर उद्यापासून (दि. 11) विविध कंपन्या आणि कार्यालये सुरु होत असल्याने परतीच्या मार्गाची सुरूवात झाली आहे. अनेकांना परतीच्या मार्गाचे बुकींग मिळू शकले नसल्याने तसेच, नियोजन नसल्याने त्यांना परतीच्या मार्गात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांना खासगी वाहनांवर अथवा इतर ट्रॅव्हर्ल्सवर अवलंबून राहावे लागत आहे. परतीचे प्रवासी हे वल्लभनगर आगारातून सोडण्यात आलेल्या जादा बसेसवरच अवलंबून असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)