चाकण हिंसाचाराप्रकणी आणखी 12 संशयित ताब्यात

चाकण- मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान चाकण येथे सोमवारी (दि. 30) उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी आणखी 12 संशयितांना आज (रविवारी) पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधीतांकडे चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे यांनी दिली. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले .
चाकण हिंसाचारात सहभागी असणाऱ्या व पोलिसांनी कारवाई केलेल्यांची संख्या आता 42 झाली आहे. दरम्यान, खासदार शिवाजी आढळराव यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन हिंसाचाराची माहिती घेतली. तसेच कारवाई करताना निरपराध्यांवर कारवाई करू नका मात्र, दोषींना सोडूही नका, असे सांगितले. यावेळी आमदार सुरेश गोरे, शेखर घोगरे, राम गावडे, किरण मांजरे आदी उपस्थित होते. दरम्यान, आज पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित 18 ते 25 वयोगटातील असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)