चाकण हिंसाचाराप्रकणी आणखी 12 जणांना अटक

राजगुरूनगर- चाकण (ता. खेड) येथे सोमवारी (दि. 30) मराठा मोर्चा दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणी शुक्रवारी (दि. 3) चाकण पोलिसांनी 12 जणांना अटक केली होती. त्यांना आज (शनिवारी) खेड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने 12 पैकी 8 जणांना बुधवार (दि. 8) पर्यंत पोलीस कोठडी तर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या हिंसाचाराप्रकरणी आता एकूण 30 जणांना अटक केली असून यातील तिघे अल्पवयीन आहेत.
चाकण व राजगुरूनगर येथे सोमवारी (दि. 30) सकल मराठा समाज क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनात पोलिसांवर दगडफेक करीत खासगी व सरकारी बसेससह अन्य वाहनांना आग लावून सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आले होते. यात सुमारे 7 ते 8 कोटी रुपयांचे यात नुकसान झाले आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केला आहे.
या प्रकरणी चाकण पोलिसांनी आतापर्यंत तीन अल्पवयीनसह 30 आरोपींना अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी तीनअल्पवयीन मुलांसह 18जणांना अटक केले होते. त्यांना पुणे येथील न्यायालयाने बुधवार (दि. 8) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. 3) चाकण पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले होते. त्यांना आज खेड न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी वाय. जे. तांबोळी यांनी 12 पैकी 8 जणांना बुधवार (दि. 8) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सरकारी वकील रजनी नाईक यांनी युक्तिवाद करताना, आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. हे प्रकरण गंभीर असून गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. या गुन्ह्याचे कट कारस्थान कुठे रचले आहे, त्याचा सूत्रधार कोण होता आणि त्याचा उद्देश काय होता. त्यांना हत्यारे कोणी पुरवली आणि याप्रकरणी आणखी हत्यारे जप्त होऊ शकतात. त्यांनी पेट्रोल बॉटल कोठून आणले याचा तपास कारवायचा आहे. त्यांचे इतर साथीदार कोण होते . याबाबत प्रत्येकाकडे वैयक्तिक चौकशी कारवयाची आहे, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.अटक करण्यात आलेल्याआंदोलकांच्या वतीने ऍड. चंद्रकांत पिंगळे, ऍड. अनिल राक्षे, ऍड. पुष्कर परदेशी यांनी बाजू सक्षमपणे मांडली. खेड तालुक बार असोसिएशनच्या वकील सदस्यांनी आंदोलकांचे मोफत वकीलपत्र घेतले आहे.

  • आरोपींची नावे
    पोलीस कोठडी : राहुल दिलीप घोडके (वय 20, सध्या चाकण, ता. खेड, मूळ गाव उस्मानाबाद), जय लालासाहेब ढावरे (वय 19), ओंकार युवराज कोरडे (वय 19), अक्षय तान्हाजी बेंडुरे (वय 20), गणेश उर्फ गणपत सतीश मुंगसे (वय 24), दीपक युवराज कोरडे (वय 20, पाचही रा. आंबेठाण रोड चाकण), ऋषिकेश एकनाथ जगताप (वय 21, रा. भोसे, ता. खेड), नागेश गोपीनाथ शिंदे (वय 38, रा. वाकी, ता. खेड).
    न्यायालयीन कोठडी : स्वप्नील बाळू भोर (वय 22, रा. वाकी, ता. खेड), सचिन महादेव शिंदे (वय 18, रा. चाकण, मुळगाव सांगवी), संकेत अरुण व्यवहारे (वय 18 रा, झित्राईमळा, ता. खेड, मूळ गाव बार्शी), नितीन पांडुरंग ढेबे (वय 21, रा. दावडमळा चाकण, ता खेड).
  • राजगुरुनगरात कडक पोलीस बंदोबस्त
    चाकण आंदोलनातील अटक करण्यात आलेल्या 12 जणांना राजगुरूनगर येथील न्यायालयात आणण्यात येणार असल्याने राजगुरुनगर शहर, न्यायलय परिसरात कायदा आणि सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा व अतिरिक्‍त सत्र न्यायालय राजगुरुनगर येथे पोलीस छावणीचे रुप आले होते. दरम्यान, आरोपींच्या नातेवाईकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)