चाकण हिंसाचारातील तेच गुन्हे माफ

चाकण- चाकण (ता. खेड) येथे 30 जुलै रोजी झालेल्या हिंसक आंदोलन झाले. यातील ज्या ठिकाणी दहा लाखां रुपयांच्या आत सार्वजनिक ठिकाणचे नुकसान झाले आहे. त्या प्रकरणात जे गुन्हे दाखल झाले आहेत, ते दिवाळी पूर्वी मागे घेण्यात येणार आहे तर दहा लाखांवरील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान व पोलीस कर्मचाऱ्यांच्यावर हल्ले करणारे जर सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असून त्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असल्याची माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर यांनी दिली.
खेड तालुका सकल मराठा क्रांती मोचाच्या वतीने 30 जुलै रोजी चाकण येथे शांततेच्या मार्गाने रस्तारोको आंदोलन सुरू होते मात्र, काही समाजकंटकांमुळे या आंदोलाना गालबोट लागले आणि आंदोलन हिंसक झाले. ही घटना चुकीची होती. त्यामुळे या घडलेल्या घटनेचा वारंवार निषेध मराठा क्रांती मोर्चाने केलेला आहे. तसेच या घटनेमुळे खेड तालुक्‍यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हेही दाखल करण्यात आले. हे गुन्हे शासनाच्या वतीने मागे घेण्यात यावेत, या मागणीचे निवेदन सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोहर वाडेकर, संभाजी दहातोंडे, अनिल सोनवणे आदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील बाबी स्पष्ट केल्या असल्याचे वाडेकर यांनी सांगितले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)