चाकण-शिक्रापूर रस्त्यावर आज रास्तारोको

शिक्रापूर- सध्या सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरले असताना कोणत्याही शेतीमालाला हमीभाव नाही आणि त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चाकण शिक्रापूर रस्त्यावरील पिंपळे जगताप चौफुला येथे मंगळवारी (दि. 30) सकाळी दहा वाजता केंदूर, पिंपळे जगताप, करंदी, जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांसह शिरूर-आंबेगाव शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येणार येणार आहे. हे आंदोलन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. दरम्यान, याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. या निवेदना नमूद केले आहे की, कांद्याला प्रती किलो दहा रुपये अनुदान जाहीर करा, ऊसाला एफआरपी प्रमाणे पहिल्या हप्त्याची रक्कम एकरकमी जमा करा, शेतीमालाला हमीभाव द्या नाहीतर गांजा उत्पादनाला परवानगी द्या या मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)