चाकण येथे रविवारी मराठा समाजाचे उपोषण

चाकण- मराठा आरक्षणच्या मागणीसाठी चाकण येथे झालेल्या 30 जुलै 2018 रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या घटनेनंतर चाकण पोलिसांकडून अटक सत्र सुरू असून या कारवाईमध्ये काही निष्पाप व्यक्‍तींना अटक करण्यात आली असून अद्यापही अटक सत्र सुऊ आहे. पोलिसांच्या धरपकड मोहिमेतील संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्यांवर वेगवेगळी कलमे लावून गंभीर गुन्हा दाखल करण्यात येत असल्याने तरुणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त होत आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करू नयेत तसेच यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी रविवारी (दि. 16) चाकण येथील नेहरू चौकात सकल मराठा क्रांती मोर्चाचे वतीने उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा मनोहर वाडेकर, अशोक मांडेकर, भगवान मेदनकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)