चाकण येथे रंगला वैकुंठ गमनाचा सोहळा

वाकी- चाकण येथे श्री तुकाराम महाज यांची श्री छत्रपती शिवराय भेट व वैकुंठ गमन सोहळ्याचे प्रसंग हुबेहुब सादर करून सलग आठ दिवस सुरू असलेल्या “तुका आकाशा एवढा’ या नाट्यमय संगीत कथेची उत्साहात सांगता झाली.
यावेळी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते, चाकण सोसायटीचे अध्यक्ष भरत गोरे, संचालक अशोक परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, चक्रेश्‍वर पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर केळकर, दतात्रय गोरे, खेड बाजार समितीचे संचालक राम गोरे, अशोक गोरे, अशोक शेवकरी, अनिल प्रधान, चाकण नगरपरिषदेच्या नगरसेविका संगीता बिरदवडे, माजी सरपंच दत्तात्रय बिरदवडे, नंदकुमार गोरे, उद्योजक विनोद गोरे, लक्ष्मण वाघ, बाळासाहेब नाणेकर, विकास धाडगे, शिवाजी धाडगे, अर्जुन धाडगे, सत्यवान गोरे, हर्षद लेंडघर, प्रकाश गोरे, प्रभाकर बारमुख, नरेंद्र राउत, व्यंकटेश सोरटे, वैशाली धाडगे, ऋषिकेश धाडगे, मुक्ताजी नाणेकर, गौरव धाडगे, छबुबाई गवळी, काजल धाडगे, पूजा धाडगे, निलेश टिळेकर, चंद्रकांत गोरे, शांताराम कानपिळे, चांगदेव सोरटे, बाळासाहेब मांजरे, अरुण निघोजकर, शिल्पा धाडगे, शुभांगी धाडगे, अनुसया धाडगे, कविता धाडगे, कल्पना धाडगे, सविता धाडगे आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ व भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हभप शंकर महाराज शेवाळे यांनी यावेळी हभप नारायण धाडगे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शेवाळे महाराज यांनी तुका आकाशा एवढा या नाट्यमय संगीत कथेतून विश्‍वंभर बाबा व अमाईमाता या अंगाला थरकाप उडवून देणाऱ्या कथेसह तुकोबांचे बालपण, विवाह कथा, संसार स्थिती, व्यापार, जिजामाता कथा, व्यापाराचे दिवाळे, श्री सद्‌गुरु भेट, श्री पांडुरंग भेट, चिंतामणी देव, मुंबाजी बुवा, रामेश्‍वर शास्त्री, अनगड शहा, कोंडीबास प्रसाद प्राप्ती, श्री छत्रपती शिवराय भेट व वैकुंठ गमन सोहळा आदि विषयांवर चौफेर मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)