चाकण येथे आढळला अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह

वाकी- चाकण येथील वेदांत संकुलच्या दुसऱ्या मजल्याच्या जिन्याजवळ एका 45 ते 47 वर्षीय अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित व्यक्‍तीची ओळख रात्री उशिरापर्यंत पटलेली नसून, चाकण पोलिसांनी शनिवारी (दि. 30) याप्रकरणी रात्री उशीरा आकस्मित मयत अशी नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे व ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी दिली.
जुन्या पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण गावच्या हद्दीत माणिक चौकाजवळ अभ्युदय बॅंकेसमोर वेदांत संकुल आहे. या संकुल मधील दुसऱ्या मजल्याच्या जिन्याजवळ अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आज (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास आढळून आला आहे. मागील आठ दिवसांपासून हा व्यक्‍ती त्याठिकाणी एका जागेवर झोपलेल्या अवस्थेत होता. आज या ठिकाणाहून दुर्गंधीयुक्‍त वास येवू लागल्याने त्यांनी याबाबतची माहिती चाकण पोलिसांना कळविताच घटनास्थळी दाखल झालेल्या येथील पोलिसांनी घटनास्थळाचा तातडीने पंचनामा करून संबंधित मृतदेह ताब्यात घेतला. चाकण ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून विच्छेदन करण्यात आले. अनोखळी मृत व्यक्‍तीचे वर्णन पुढील प्रमाणे; रंग काळा-सावळा, उंची साडेपाच फुट, डोक्‍याचे केस काळे, अंगात चौकटी काळ्या रंगाचा शर्ट, नेसणीस अंतर्गत वस्र व काळ्या रंगाची पॅट आहे. या व्यक्‍ती बद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी त्वरीत चाकण पोलीस ठाण्याशी अथवा 02135 – 249333 याक्रमाकावर साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलीस हवालदार नामदेव जाधव यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)