चाकण येथे अहमदनगरच्या तरुणाची आत्महत्या

वाकी- खोलीतील छताला पंख्याच्या हुकाला अहमदनगरच्या एका 34 वर्षीय तरुणाने कापडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण येथील गोल्डन चौकातील धाडगे आळीत शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान घडला. मात्र, संबंधित तरुणाच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसल्याने येथील पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. प्रमोद विठ्ठल जाधव (वय 34 वर्षे, सध्या रा. गोल्डन चौक, धाडगेआळी, चाकण, ता. खेड, मूळ, रा. कळंब, ब्राह्मणवाडा, ता. अकोले, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. येथील युवा उद्योजक उमाकांत सुरेश धाडगे (वय 30 वर्षे, रा. गोल्डन चौक, धाडगे आळी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, प्रमोद जाधव हे चाकण येथील धाडगे आळीतील धाडगे यांच्या खोलीत पत्नी स्वाती हिच्यासह गेल्या एक महिन्यापासून भाड्याने राहत होते. प्रमोद हा आजारी असल्याने तो घरीच असायचा. तर त्याची पत्नी स्वाती ही कामाला जात होती. शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी 5.30 च्या दरम्यान प्रमोद याने राहत असलेल्या भाड्याच्या खोलीतील छताला पंख्याच्या हुकाला कापडाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रमोद याच्या आत्महत्येची कुजबुज खोलीचे मालक धाडगे यांना समजल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती येथील पोलिसांना कळविली असता घटनास्थळी दाखल झालेल्या चाकण पोलिसांनी तातडीने पंचनामा करून उपस्थित नागरिकांच्या मदतीने प्रमोद याचा पंख्याच्या हुकाला लटकलेला मृतदेह खाली उतरविला. संबंधित प्रमोद जाधव या तरुणाचा मृतदेह चाकण पोलिसांनी ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. जाधव याच्या मृतदेहाचे विच्छेदन होताच रात्री उशिरा त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. प्रमोद याच्या आत्महत्येचे नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजले नसल्याने येथील पोलिसांनी याप्रकरणी आकस्मित मृत्यू अशी नोंद केली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)