चाकण येथून वाहनचालक बेपत्ता

वाकी-टपरीवरून तंबाखू खाऊन येतो, असे सांगून गेलेला वाहनचालक गेल्या पंधरा दिवसांपासून चाकण येथून निघून गेला असून, तेव्हापासून तो परत घरी आला नसल्याने तो बेपत्ता आहे.
नवनाथ किसन पडवळ (वय 32, रा. भाग्यतारा सोसायटी, बी. विंग फ्लॅट नं. 901, मार्केटयार्ड, जवळ, चाकण) असे बेपत्ता झालेल्या वाहन चालकाचे नाव आहे. त्यांची पत्नी राजश्री नवनाथ पडवळ (वय 25) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नवनाथ पडवळ हे चाकण येथील आंबेठाण चौकातून 23 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान टपरीवरून तंबाखू खाऊन येतो, असे सांगून निघून गेले आहेत. वर्णन पुढीलप्रमाणे – रंग काळा सावळा, उंची पाच फुट, अंगात मेहंदी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जीन्स प्यांट, चॉकलेटी जर्किन, पायात काळ्या रंगाची चप्पल, शिक्षण नववी, अंगाने सडपातळ, मराठी, हिंदी भाषा लिहिता वाचता येते. या वर्णनाच्या तरुणाबद्दल कोणाला काही माहिती असल्यास अथवा कोठे आढळल्यास त्यांनी ताबडतोब चाकण पोलीस ठाण्याशी संपर्क ( फोन नं. 02135 – 249333 )साधण्याचे आवाहन पोलीस हवालदार नामदेव जाधव व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)