चाकण येथून दुचाकी, सायकलची चोरी

चाकण- येथील बालाजीनगरतून एक मोटार सायकल तर माणिक चौकातून राहत्या घरासमोरून सायकल चोरट्याने चोरून नेल्याची माहिती ठाणे अंमलदार सुभाष पवार यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही घटना शनिवारी (दि. 26) घडल्या. बालाजी नगर येथून रात्री नऊच्या सुमारास राहत्या घरासमोरून दुचाकी (एमएच 14 एमटी 4967) चोरीस गेली. याबाबत अरविंद कारभारी नरवडे यांनी फिर्याद दिली आहे. तर रात्री अकराच्या सुमारास सायकल चोरी गेली. याबाबत बंडू संभाजी पवार यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष देवाडे व संजय जरे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)