चाकण-भोसरी मार्गावर पीएमपीएमएल बंद

चिंबळी – येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर नियमित धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या बस काही ना काही कारणाने सतत बंद पडत आहेत. या बसची सेवा भोसरी ते राजगुरूनगर आणि मनपा भवन ते महाळुंगे, चाकण या मार्गावर आहे. बस बंद पडत असल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे हाल होता आहेत.

गुरुवारी (दि. 28) सकाळी 11 वाजता चाकण -भोसरी रस्त्यावर बालाजी नगर येथे भोसरी ते मनपा जाणारी 120 क्रमांकाची बस बंद पडली आणि बसप्रवाशांना भर उन्हात बसमधून उतरण्यात आले, त्यामुळे शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे, तसेच कर्मचारी वर्गाचे हाल झाले. पीएमपीएमएलच्या बस सतत बंद पडत असल्याने त्याचा त्रास या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना सातत्याने होत असतो. त्यामुळे या मार्गावर चांगल्या स्थितीतील बस सोडाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)