चाकण बाजारात शुकशुकाट

दिवाळी असूनही दुकानदार ग्राहकांच्या प्रतीक्षेत

चाकण- दिवाळी सण मोठा आनंदला नाही तोटा याप्रमाणे गरिबांपासून श्रीमंत हा सण आपल्या ऐपतीप्रमाणे साजरा करतात मात्र, ऑनलाईन खरेदी व मॉलच्या गिफ्ट कुपनमुळे चाकण परिसरातील व्यवसायिकांना ग्राहकां अभावी दिवाळी कशी साजरी होईल, याची चिंता लागलेली आहे. दिवाळी सणासाठी खरेदी करणाऱ्यांची झुंबड बाजारपेठेत उडते, पण यावर्षी चाकण परिसरातील व्यावसायिकांना वेगळाच अनुभव आला आहे. सणाच्या खरेदीसाठी व्यावसायिकांनी आपली दुकाने सजवली देखील; परंतु ऐन दिवाळीत आज (रविवार) असूनही ग्राहकांअभावी चाकण परिसरातील दुकाने ओस पडली होती .
चाकण परिसर हा औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्ध आहे सुमारे हजार ते बाराशे छोटे मोठे उद्योग ऑटो हब नावाने चाकणची असणारी ओळख कांदा मार्केट, जनावरे बाजारामुळे येथे होणारी प्रचंड उलाढाल असे असताना देखिल या भागातील बहुसंख्य नागरिकांचा खरेदीसाठी कल मात्र शहरी भागाकडे आहे. औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार याच परिसरात स्थायिक आहेत. दरवर्षीप्रमाणे कंपन्याकडून कामगारांना दिवाळी बोनस वाटप केले जाते, यावर्षीही झाले मात्र रोख स्वरूपात रक्कम जमा न करता बहुतांश कंपन्यानी आपल्या कामगार वर्गाला गिफ्ट व्हावचर कूपन बोनस म्हणून दिली असून ती बोनस व्हावचर पुण्यातील काही मॉलमध्येच उपयोगात आणता येणार असल्याने कामगारांनी यावर्षी आपली कपडे, व इतर खरेदी पुणे, पिंपरी-चिंचवड आदी ठिकाणी केली आहे.

  • प्लॅस्टिक मनीचा वापर वाढला
    बदलत्या काळानुसार प्लॅस्टिक मनी चाही वापर यावर्षी प्रचंड वाढल्याने रोख स्वरूपात खरेदी करणाऱ्यांची उणिव बाजारपेठेत प्रकर्षाने जाणवत आहे. फटाका विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांना परवाना मिळवण्यासाठी अतोनात परिश्रम घ्यावे लागल्याने फटका स्टॉल उशिरा सुरू झाले त्यामुळे त्यांच्याकडेही गिऱ्हाईकांचा अभाव आहे. तसेच कापड दुकानदार, मिठाईवाले हे व्यावसायिकही अद्याप ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. असे असताना सराफ बाजारात खरेदी विक्रीची उलाढाल अंशतः वाढली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)