चाकण बाजारातील उलाढाल मंदावली

चाकण- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डवर कांद्याची आवक 410 क्विंटल ने घसरली व भावही उतरले. तर बटाटा आवक 1682 क्विंटल ने कमी होऊन भाव मात्र 1700 रुपयांवर स्थिर झाले. हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, काकडी, फरस बी, वालवर, वाटाणा, शेवगा या फळभाज्यांची आवक या आठवड्यात कमी झाली, तर भाव कमी अधिक प्रमाणत उतरले. लसूण आवक 5 क्विंटल ने वाढली तर भाव 2500 रुपयांवर स्थिर झाले. भूईमुग शेंग आवक 10 पोती झाली . व भावही उतरले. फळभाज्या आवक घटली व भाव उतारले. बाजारात एकूण उलाढाल 1 कोटी 45 लाख ते 1 कोटी 50 लाख रुपये झाल्याने उलाढाल मंदावली.
चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डवर चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 350 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1100 रुपये झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1100 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1682 क्विंटलने घटली, बटाट्याचा कमाल भाव 1700 रुपये स्थिर झाला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 10 पोती झाली. लसणाची एकूण आवक 25 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 339 पोती झाली. भाव 2500 रुपये स्थिर झाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 1 लाख 40 हजार जुड्यांची आवक होऊन 200 ते 1100 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 1 लाख 20 हजार जुड्यांची आवक होऊन 101 ते 800 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला.शेपू आवक 70000 हजार जुड्या झाली. 101 ते 600 असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा
क्रमांक एक : 1100
क्रमांक दोन : 1000
क्रमांक तीन : 800
एकूण आवक : 350 क्विंटल
बटाटा
क्रमांक एक : 1700
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 1100 क्विंटल
लसूण
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2000
क्रमांक तीन : 1800
एकूण आवक : 25 क्विंटल
भुईमूग शेंग
क्रमांक एक : 5000
क्रमांक दोन : 4500
क्रमांक तीन : 4000
एकूण आवक : 10 पोती
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागाना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 972 पेट्या (500 ते 1000), कोबी : 982 पोती (500 ते 1000), फ्लॉवर : 318 पोती (400 ते 800), वांगी : 518 पोती (2000 ते 3000), भेंडी : 394 पोती (2000 ते 3000), दोडका : 269 पोती (2000 ते 3000), कारली : 318 डाग (1500 ते 2500), दुधीभोपळा : 235 पोती (500 ते 1500), काकडी : 381 पोती (500 ते 1000), फरशी : 194 पोती (1500 ते 2500), वालवड : 132 पोती (2500 ते 3500), गवार : 164 पोती (3000 ते 4000), ढोबळी मिरची : 518 डाग (1000 ते 2000), चवळी : 190 पोती (1000 ते 2500), शेवगा : 41 डाग (3500 ते 4500).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 12340 जुड्या ( 400 ते 800), कोथिंबीर : एकूण आवक : 24530 जुड्या (500 ते 900), शेपू : एकूण आवक : 4520 जुड्या (300 ते 600), पालक : एकूण आवक : 3290 जुड्या (500 ते 800).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 150 जर्शी गायींपैकी 95 गाईची विक्री झाली त्यांना 10 ते 40 हजार रुपये, 140 बैलांपैकी 75 बैलांची विक्री झाली त्यांना 10 ते 30 हजार रुपये, 95 म्हशींपैकी 65 म्हशींची विक्री झाली त्यांना 15 ते 80 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 3250 शेळ्या-मेंढ्यापैकी 2570 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1500 ते 9 हजार रुपये इतका भाव मिळाला. जनावरांच्या बाजारात 85 लाख रुपये उलाढाल झाली. या आठवड्यात उलाढाल कमी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)