चाकण बाजारभाव : उलाढला वाढली;

चाकण- चाकण बाजारात कांद्याची आवक अवघी 30 क्विंटलने वाढली तर भाव उतरले. तर या आठवड्यातही बटाटा आवक 200 क्विंटलने वाढून भावही वधारले. हिरवी मिरची आवक या घटून भाव स्थिर झाले. लसूण आवक व भाव वधारले. भूईमुग शेंग आवक या आठवड्यात 24 पोती झाली. फळभाज्यांची आवक वाढली व भाव उतारले. बाजारात एकूण उलाढाल 3 कोटी 80 लाख ते 3 कोटी 85 लाख रुपये झाली .उलाढाल वाढली.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांद्याची आवक 30 क्विंटलने वाढली, भाव या आठवड्यात 99 रुपयाने उतरले, बटाटा आवक 200 क्विंटल ने वाढली भाव 1700 रूपये झाले. चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक 680 क्विंटल झाली. कांद्याचा कमाल भाव 1251 रुपयांवर स्थिर झाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक 1800 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 200 क्विंटलने वाढली, बटाट्याचा कमाल भाव 1700 रुपये झाला. या आठवड्यात भूईमुग शेंगाची आवक 24 पोती झाली. लसणाची एकूण आवक 19 क्विंटल झाली असून, लसणाचा कमाल भाव 2 हजार 500 रुपयांवर स्थिर झाला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 341 पोती झाली. भाव 4 हजार रुपयांवर स्थिर झाला.
राजगुरूनगर येथील मुख्य बाजारात मेथीची 90 हजार जुड्यांची आवक होऊन 250 ते 1150 रुपये प्रती शेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबीर 1 लाख 25 हजार जुड्यांची आवक होऊन 101 ते 550 रुपये असा प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. शेपू आवक 45 हजार जुड्या झाली. 201 ते 600 असा जुड्यांना भाव मिळाला .
शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव (क्विंटलमध्ये)
कांदा :
क्रमांक एक : 1251
क्रमांक दोन : 800
क्रमांक तीन : 600
एकूण आवक : 680 क्विंटल
बटाटा :
क्रमांक एक : 1700
क्रमांक दोन : 1500
क्रमांक तीन : 1200
एकूण आवक : 1800 क्विंटल
लसूण :
क्रमांक एक : 2500
क्रमांक दोन : 2000
क्रमांक तीन : 1800
एकूण आवक : 19 क्विंटल
भूईमुग शेंग :
क्रमांक एक : 5300
क्रमांक दोन : 4000
क्रमांक तीन : 4500
एकूण आवक : 24 पोती
आवक 24 पोती,भाव क्रमांक 1: 5300,2:4000,3:4500रुपये .
फळभाज्या : प्रती 10 किलोंसाठी डागांना मिळालेले भाव (रुपयांत)
टोमॅटो : 1015 पेट्या (800 ते 1600), कोबी : 310 पोती (1000 ते 1600), फ्लॉवर : 349 पोती (500 ते 1000), वांगी : 547 : पोती (2000 ते 3000), भेंडी : 618 पोती (1500 ते 3000), दोडका : 492 पोती (2000 ते 3000), कारली : 572 डाग (1500 ते 2500), दुधीभोपळा : 247 पोती (600 ते 1200), काकडी : 338 पोती (600 ते 900), फरशी : 148 पोती (1500 ते 3500), वालवड : 194 पोती (2000 ते 4000), गवार : 318 पोती (2000 ते 3500), ढोबळी मिरची : 394 डाग (2000 ते 3000), चवळी : 119 पोती (2000 ते 3000), शेवगा : 81 डाग (3000 ते 5000).
पालेभाज्या : प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव (रुपयांत)
मेथी : एकूण आवक : 21532 जुड्या (300 ते 600), कोथिंबीर : एकूण आवक : 30945 जुड्या (100 ते 400), शेपू : एकूण आवक : 6934 जुड्या (100 ते 300), पालक : एकूण आवक : 5242 जुड्या (300 ते 500).
जनावरे : चाकण येथील जनावरांच्या बाजारात बकरी ईदमुळे बोकडांची आवक झाली. विक्रीसाठी आलेल्या 115 जर्शी गायींपैकी 65 गाईची विक्री झाली 10 ते 35 हजार रुपये, 150 बैलांपैकी 85 बैलांची विक्री झाली 10 ते 30 हजार रुपये, 150 म्हशींपैकी 105 म्हशींची विक्री झाली 15 ते 60 हजार रुपये, शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 1000 शेळ्या-मेंढ्यापैकी 800 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1200 ते 9 हजार रुपये इतका भाव मिळाला. बोकड 3000 पैकी 2000 बोकडांची विक्री झाली. जनावरांच्या बाजारात 3 कोटी 15 लाख रुपये उलाढाल झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)