चाकण बाजारपेठेतील अतिक्रमणे हटविली

चाकण -येथील शनी मंदिर ते मारुती मंदिर बाजारपेठेत नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. शनी मंदिर ते मारुती मंदिर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारे लहान मोठे ओटे, कट्टे, नामफलक, पत्रा शेड हटविण्यात आले. मात्र, काही ठिकाणी आठ मीटर व काही ठिकाणी सात मीटर असे अंतर घेऊन हद्द निश्‍चित करण्यात आली. सगळ्या ठिकाणी सारखेच माप घेऊन रस्ता हद्द निश्‍चित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली.
चाकण नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, उपमुख्याधिकारी मेमाणे, दणाणे यांनी चाकण पोलिसांच्या बंदोबस्तात अतिक्रमणे काढली. मात्र, आज अतिक्रमण कारवाई करताना काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात कारवाई केल्याने काही रहिवाशांनी नाराजी व्यक्‍त केली.

दलितेत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत चाकण नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 व 19 मधील हायस्कूल ते शनिमंदिर या बाजारपेठ रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे व रस्त्याच्या कडेने स्टॉर्म वॉटर पाईप टाकून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाकरिता रस्त्यात येणारे ओटे, पायऱ्या व इतर स्वरूपाचे कच्चे व पक्के बांधकाम काढून टाकण्याबाबत चाकण नगर परिषदेने चार दिवसांपूर्वी बाजारपेठेतील रहिवाशांना लेखी नोटीसद्वारे स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी कळविले होते.
या रस्त्याचे काम करण्याकरीता नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने दि. 12 ऑगस्ट 2016 रोजी ठराव करून त्यास मान्यता दिली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटाराचे काम करण्यात येणार आहे. या रस्त्याची रुंदी मंजूर बांधकाम नकाशानुसार 6 मीटर असून दोन्ही बाजूला गटारीसाठी एकेक मीटर असा 8 मीटर क्षेत्रात रस्त्याचे व गटाराचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 19 मार्च रोजी रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला 4 मीटर अंतरावरील पायऱ्या, ओटे, कच्चे व पक्के बांधकाम काढून घेण्यासाठी नोटीसद्वारे कळविण्यात करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)