चाकण पोलीस ठाण्यासमोर मराठा समाजाचे आज उपोषण

चाकण- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण येथे झालेल्या 30 जुलै रोजी झालेल्या मराठा क्रांती मोर्चा वेळी, पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना मारहाण, जाळपोळीची घटना घडली या घटनेत काही समाजकंटकांनी रास्तारोको आंदोलनाचा फायदा घेत या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून अटक सत्र सुरू असून या कारवाईमध्ये काही निष्पाप व्यक्‍तींना अटक करण्यात आली व अजूनही काही जणांना अटक करण्यासाठी संबंधितांच्या घरी जात असून त्यांना अटक का करण्यात येत आहे तसेच कशाच्या आधारे अटक करीत आहेत हे सांगितले जात नाही. अटक केल्यानंतर पोलीस प्रशासन त्यांना आरोपी ठरवत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड राग, भीती निर्माण झाली आहे. चाकण येथील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस खात्याने केलेल्या धरपकड मोहिमेतील संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या व्यक्‍तींवर अनेक कलामांसह 326 सारखा गंभीर गुन्हा दाखल करून तरुणांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करीत असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करू नयेत, तसेच या मोर्चाचे आयोजक कुशल चंद्रमोळी जाधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी बुधवारी (दि. 10) चाकण पोलीस ठाण्यासमोर सकल मराठा क्रांती मोर्चाचे वतीने उपोषण केले जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)