चाकण दंगलीचे सूत्रधार दिलीप मोहिते

आळंदी- मराठा समाजाचे चाकण येथे शांततेस सुरू असलेले आंदोलन माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे भडले. त्यामुळे या दंगलीचे खरे सुत्रधार दुसरे-तिसरे कोणी नसून मोहिते हेच असल्याचा आरोप आरपीआय खेड तालुका अध्यक्ष संतोष डोळस यांनी केला आहे.
चाकण शहरात झालेली दंगल ही चिथावणीखोर भाषणामधून घडलेली दंगल आहे. याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. खेड तालुक्‍याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा यापूर्वी मराठा आंदोलनात कसलाही सक्रिय किंवा पडद्यामागून संबंध नव्हता हा इतिहास आहे; परंतु बंदचा राजकीय फायदा उठवून, आपले गमावलेले राजकीय अस्तित्व परत कसे मिळविता येईल, या दृष्टीने या आंदोलनात कसलाही आजतागायत संबंध नसताना चाकण बंदच्या दिवशीच आंदोलनात मोहिते यांनी चिथावणीखोर भाषण करून आगीमध्ये तेल ओतण्याचे काम केले हे सोशल मीडियावरुन व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्‍लिपवरुन लक्षात येते. दिलीप मोहिते हे माजी आमदार आहेत. उलटपक्षी समाजाला शांत करण्याचे दायित्व स्विकारुन दंगलीचा भडका अधिक तीव्र होणार नाही यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक असताना त्यांनी चिथावणीखोर भाषण करून आपले गमावलेले राजकीय गतवैभव परत मिळवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप डोळस यांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी अशी मागणी डोळस यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसेच संबंधित सर्व विभागांकडे निवेदनाद्वारे व पुरव्यानिशी केली असल्याची माहिती डोळस यांनी दिली.
माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या या कृत्यामुळे 8 ते 10 कोटी रुपयांची राष्ट्रीय संपत्ती व व्यक्‍तीगत स्वरुपाचे नुकसान होऊन मोठी हानी झाली आहे. या दंगलीत आजतागायत 30 ते 35 नागरिकांना पोलीस यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. यात ज्यांचा-ज्यांचा सहभाग आहे, त्या सर्वांवर कारवाई होणे गरजेचे आहे. यात कोणाही निरपराधांवर अन्याय होता कामा नये. तसेच या दंगलीचा खरा मास्टर माईंड कोण आहे याचा शोध घेणे देखील क्रमप्राप्त आहे. त्यामुळे ज्यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे चाकणची दंगल घडवून आणली किंवा यामागचा खरा सुत्रधार कोण आहे याची सखोल चौकशी करून, त्यांच्यावर कडक कारवाई, व्हावी असेही निवेदनात नमूद केले आहे.

  • माझ्यावर करण्यात आलेला हा आरोप चुकीचा असून राजकीय स्वार्थापोटी करण्यात आला आहे. तसेच चाकण हिंसाचाराचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे याबाबत जास्त काही बोलणे योग्य नाही. विरोधकांनी हे राजकीय षड्‌यंत्र रचून माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे व न पटणारे आहेत. दंगलीचे खरे सुत्रधार कोण? याचा शोध घेऊन, संबंधितांवर कठोर कारवाई करावी त्यामुळे खरा हिंसाचार कोणी भडकविला हे सत्य समाजासमोर येईल.
  • – दिलीप मोहिते, माजी आमदार
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)