चाकण-खालुंब्रे रस्त्यावर बेकायदा पार्किंग

वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासी रडकुंडीला

वाकी- अहमदनगर ते मुंबई या राज्य मार्गावरील चाकण-खालुंब्रे रस्त्यावर जड-अवजड वाहने रस्त्याच्या दुतर्फा धोकादायक पद्धतीने उभी केली जात असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरशः रडकुंडीला आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करण्यात येणारी वाहने हटविण्यात यावीत.
वर्दळीचा असलेल्या या रस्त्याच्या दुतर्फा कंटेनर सारखी मालवाहू अवजड वाहने उभी केली जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ही बेकायदा पार्किंग केलेली वाहने हटविण्याची गरज निर्माण झाली आहे. चाकण – खालुंब्रे हा राज्य मार्ग वर्दळीचा असून, प्रचंड वेगाने विस्तारत असून, या भागातील अनेक वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने अवैधरीत्या भर रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने वाहतूककोंडी होत आहे. चाकण पासुन पुढे विविध गावांच्या परिसरात अनेक लहान मोठ्या कंपन्या कार्यरत आहेत. तर नविन कंपन्या उभारण्यात येत आहेत. बहुतेक काही कंपन्यानी उत्पादन सुरु केले आहे. अशा कंपन्यात कच्चा माल घेऊन येणाऱ्या अनेक वाहने या कंपन्यांच्या गेटवर उभ्या राहत असतात. काही वाहनचालकांना तर आत कंपनीत जागा नाही, असे सांगून दोन तीन दिवस बाहेर ठेवले जाते. अन्य राज्यातून आलेल्या वाहन चालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा वेळी त्यांची वाहने ही कंटेनर किंवा त्याही पेक्षा मोठी अवजड असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे रस्ता जरी मोठा असला तरी निम्या रस्त्यापर्यंत वाहने उभ्या असल्याने हा रस्ता वाहतुकीस अपुरा ठरत असून, त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

  • वारंवार घडताहेत अपघात
    या भागातील अनेक शेतकरी अथवा गुंठा मंत्र्यांनी ठिकाणी वाहन तळासाठी जागा सोडल्या असून, केवळ त्या जागा विकसित न केल्याने रस्त्यावर वाहने लावली जात आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी वाहनतळाची जागा स्वतःची वाहने पार्किंगसाठी घेतल्याने कंपनीत कच्चा माल घेऊन आलेली वाहने रस्त्यावर तसेच बाहेर बेशिस्तपणे उभी केल्या जात असल्याने त्याचा फटका प्रवाशाना बसत आहे. अनेकवेळा अशा उभ्या असणाऱ्या वाहनांच्या मधून अचानक एखादी व्यक्ती किंवा लहान वाहन आले तर ते दिसत नाही. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहे.

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)