चाकणला 17 लाखांचा गुटखा पकडला

चाकण- संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असताना परराज्यातील येणारा गुटखा मालाचा ओघ सातत्याने वाढतच आहे. शुक्रवारी (दि.13) पहाटे 5 च्या सुमारास चाकण पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने चाकणजवळ केलेल्या कारवाईत सुमारे 41 पोती एक्का नावाचा जर्दायुक्त सुमारे 17 लाख 31 हजार 840 रुपयांचा गुटखा पकडला.
या भागातील ही दुसऱ्यांदा झालेली मोठी कारवाई असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे आणि अन्न भेसळ सुरक्षारक्षक महेंद्र पाटील यांनी दिली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, छुप्या पद्धतीने गुटखा विक्री जिल्ह्यात होत आहे, अशी माहिती प्रशासनाकडे होती. मात्र, ठोस माहिती मिळत नसल्याने कारवाईस शिथीलता आली होती.गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि.13) पहाटे मुंबई येथून एक आयशर कंपनीच्या टेम्पो शिक्रापूर येथे गुटखा घेऊन जाणार असल्याचे पहाटे गस्त पथकाच्या निदर्शनास आले. या टेम्पोतून सुमारे 17 लाख 31 हजार 840 रुपयांचा गुटखा आणि 8 लाख रुपयांचे वाहने असा सुमारे 25 लाख 31 हजार 840 रुपयांचा ऐवज चाकण पोलीस अन्न आणि औषध प्रशासनान यांच्या संयुक्तपणे झालेल्या कारवाईत जप्त केला आहे. या कारवाईत एमएच 04- एचडी 5890 हे वाहन ताब्यात घेऊन टेम्पोचालक बिपीन वैचन गिरी आणि क्‍लिनर मुकेश काशी गिरी यांना ताब्यात घेतले आहे. कारवाईत चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शेखर कुलकर्णी, अजय भापकर, संजय सूळ, नवनाथ खेडकर, होमगार्ड वैजनाथ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)