चाकणला उद्योजकावर बेकायदा सावकारीचा गुन्हा दाखल

वाकी- दहा टक्के व्याज दराने दिलेल्या रकमेपेक्षा व्याजाचे जास्त पैसे उकळण्यासाठी तगादा लावून एकास हातपाय तोडण्याची, ट्रक ओढून नेण्याची आणि न्यायालयात कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका बड्या उद्योजकावर शुक्रवारी (दि. 23) बेकायदा सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. सावकारकीचा गुन्हा दाखल होण्याची महिनाभरातील ही दुसरी मोठी घटना आहे.
मंदार परदेशी (रा. चाकण) असे या सावकार उद्योजकाचे नाव आहे. सुदाम रंगनाथ गारगोटे (वय 74, रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तीन वर्षापूर्वी अर्थात 15 सप्टेंबर 2015पासून आजपर्यंत हा प्रकार चाकण येथील विशाल टायर्सच्या दुकानाजवळ, स्वयंवर मंगल कार्यालयाजवळील पोल्ट्री फार्मजवळ घडला असल्याचे गारगोटे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुदाम गारगोटे यांचा मुलगा विजय याने परदेशी यांच्याकडून दीड लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. या रकमेच्या मोबदल्यात गारगोटे यांच्याकडे वेळोवेळी दहा टक्के व्याजदराने एकूण 3 लाख 60 हजार रुपये मुद्दलापेक्षा जास्त व्याजाच्या पैशांसाठी तगादा लावला. त्यासाठी परदेशी यांनी गारगोटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मोबाईलवर फोन करून शिवीगाळ, दमदाटी करून पैसे आणि व्याज दिले नाहीतर “मी तुमच्या मुलाचे (विजय) हातपाय तोडून टाकीन. तसेच तुमचा ट्रक माझ्या घरी आणून उभा करीन आणि तुम्ही दिलेला कोरा धनादेश (चेक) आणि कोरा स्टॅंपपेपर याच्या सहाय्याने तुमच्यावर न्यायालयात कायदेशीर कारवाई करीन. तुमच्या घरी येऊन धिंगाणा घालीन. तुम्हाला येथे जगू देणार नाही’, अशी धमकी दिली. चाकणचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत गवारी आणि सहकारी अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)