चाकणमार्गे आळंदी-राजगुरूनगर पीएमपी सुरू करा

आळंदी- चाकणमार्गे आळंदी-राजगुरूनगर अशी पीएमपीची बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी पीएमपीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे पुणे जिल्हा शिवसेना प्रमुख राम गावडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. तीर्थक्षेत्र आळंदी येथून चाकण ही औद्योगिक नगरी व खेड (राजगुरूनगर) हे तालुक्‍याचे ठिकाण असल्याने रोजगार, शासकीय कामे, शाळा-महाविद्यालये, देवदर्शन व विविध कामे आदींसाठी या तिन्ही ठिकाणी रोज हजारो नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, या तिन्ही गावांना जोडणाऱ्या मार्गावर पीएमपी सारखी सक्षम व सुरक्षित वाहतूक व्यवस्था नसल्याने आजवर अनेकांना आपला जीव धोक्‍यात घालुन खासगी अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे, अन्‌ तोही खासगीवाल्यांच्या मनमाणीनुसार. तरी पीएमपीने या मार्गावर त्वरित बस सेवा सुरू करावी, अशी मागणी राम गावडे यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)