चाकणमध्ये सामुदायिक कवायत

चाकण- प्रभात फेरी, सामुदायिक कवायत, संचलन, लेझीम, झेंडावंदन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रम व खाऊ वाटप आदी उपक्रमांनी चाकण व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
चाकण नगरपरिषदेचे ध्वजारोहण उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष शेखर घोगरे यांनी केले. श्री शिवाजी विद्या मंदिर प्रशालेतील नगरसेवक धीरज मुटके यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य अरुण देशमुख, चाकण शहर शिवसेना कार्यालयात बिपिन रासकर यांच्या अध्यक्षतेखाली दीपाली भोई, आंबेडकरनगर येथे प्रतिमा घोगरे यांच्या अध्यक्षतेखाली सुनीता गुलाब पवार, नेहरू चौक येथे सरफराज सिकिलकर यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय सागर, गोल्डन चौकात संतोष खुडे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गायकवाड, सुभाष चौकात सुमन जगनाडे यांच्या अध्यक्षतेखाली सुशीला पिंगळे, तर माळआळीत मंगल शेवकरी यांच्या अध्यक्षतेखाली मीराबाई मंडलिक यांनी ध्वजारोहण केले. तर चाकण पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी ध्वजारोहण केले. पोस्ट कार्यालयासमोर पोस्ट मास्तर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चाकण प्राथमिक शाळेत शंकरराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सुशील खोले यांनी ध्वजारोहण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)