चाकणमध्ये बंदवर “ड्रोन’द्वारे नजर

चाकण – चाकण, दि. 30 (वार्ताहर) – सकल मराठा मोर्चाच्यावतीने 30 जुलैरोजी चाकणमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले होते. त्यामुळे अशी परिस्थिती पुन्हा उद्‌भवू नये यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर बंद परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रथमच ड्रोन कॅमेराचा वापर केला. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून चाकणसह संपूर्ण खेड तालुक्‍यातील इंटरनेट सेवा सकाळी 8 वाजल्या पासून सायंकाळी साधरणत: 5 वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती.
मराठा आरक्षण मागणी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुकारलेल्या बंदला आज चाकण मध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्वच व्यवहार पूर्णपणे बंद होते. दरम्यान, 30 जुलै रोजी झालेल्या हिंसक आंदोलनच्या पार्श्‍वभूमीवर आज पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. पुणे-नाशिक महामार्गावर किरकोळ खासगी वाहने व दुचाकी वगळता पूर्ण रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे वेगात वाहन चालविण्याचा आनंद तरूणाई ने लुटला. मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढून शासनाचा निषेध व्यक्त केला. व पोलीस ठाण्या शेजारील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरामध्ये भजन आणि ठिय्या आंदोलनात खेड तालुका सकल मराठा समन्वयक मनोहर वाडेकर, कालिदास वाडेकर, अतिष मांजरे, अनिल सोनवणे, राहुल नायकवाडी, नितीन मांजरे, गणेश पऱ्हाड, धनंजय गारगोटे, व्यंकटेश सोरटे व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आपल्या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना दिले.
दरम्यान, हिंसक आंदोलनाचा अनुभव घेता बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी मकरंद रानडे आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चाकण शहराला भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)