चाकणमधील वाहतूक कोंडीविरोधात आंदोलन

चाकण-पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांची यातून सुटका व्हावी, यासाठी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली चाकण-तळेगाव चौकात आंदोलन करण्यात आले.
जिजाऊ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह चाकण आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनी देखील रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल संताप व्यक्त केला. रोज रोज ट्रॅफिकमध्येच मरायचं का?, क्‍लच दाबून दुखतोय ना पाय, पेट्रोलमध्ये जातोय ना पैसा यांसारखे फ्लेक्‍स हातात घेऊन नागरिक आपला रोष व्यक्त करत होते. वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागलेत, तर अनेक जण जखमी झालेत. याविरोधात नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. वेळेवर आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालक अनेकदा तीन-चार तास या वाहतूक कोंडीत अडकून पडतात. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अवस्था ‘रोजचं मढं त्याला कोण रडं’ अशी झाली आहे. जिथं केवळ 10 मिनिटांच अंतर आहे तिथं पोहोचायला एक ते दीड तास लागतो. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कोणीही या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाही, जीव जातो तो आमचाच, अशा शब्दांत नागरिकांनी आल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)