चाकणमधील राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा

चाकण – जबरदस्तीने घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात चाकण नगरपरिषदेतील राष्ट्रवादीच्या स्वीकृत नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली अशी माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. राहुल किसन कांडगे (रा. चाकण, ता. खेड) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी कांडगेने पीडित महिलेच्या पतीकडे असलेल्या पैशाच्या कारणावरून व फिर्यादी राहत असलेल्या घराच्या वादावरून महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून फिर्यादी महिलेस हॉल मधून बेडरूममध्ये खेचून तू इथेच बस असे बोलून फिर्यादिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर व खांद्यावर दुखापत झाली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार पुढील तपास करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)