चाकणजवळ एकावर गोळीबार

चाकण-येथील चाकण-रोहकल रस्त्यालगत असणाऱ्या एएमएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ एका 43 वर्षीय व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये हा व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रमेश पंढरीनाथ लांडे (वय 43, रा. चाकण-बिरदवडी, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. रमेश यांच्या डाव्या हाताला गोळी लागून आरपार गेली तर दुसरी गोळी उजव्या हाताला चाटून गेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश लांडे यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला असून हा झालेला हल्ला जुन्या आर्थिक व्यवहारावरून झाल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. योग्य पद्धतीने तपास करुन गोळीबार करणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले असल्याचे चाकण पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)