चाकणच्या बाजारात बोकडांची विक्रमी आवक

वाकी- बकरी ईदमुळे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये बोकडांची विक्रमी आवक झाली असून, या बोकडांना 10 हजार रुपयांपासून तब्बल 35 हजार रुपयांपर्यंत कमाल भाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले व सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही बकरी ईदमुळे चाकण बाजार बोकडांनी खच्चून भरला आहे. या बाजारात दोन हजार बोकडांची आवक झाली असून, त्यांना चांगला भाव मिळाला आहे. तसेच आखाड पार्ट्यांना प्रचंड जोर आल्याने चाकण बाजारात बकरांच्याही संख्येत मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात 16 हजार मेंढ्यांची आवक झाली असून, त्यापैकी 12 हजार 500 मेंढ्यांची विक्री झाल्याचे बाजार चांभारे, गायकवाड व शामराव बारणे यांनी सांगितले. आषाढ महिन्यात म्हणजेच आखाडात मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर अनेकांचा मोठा भर असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आखाड महिना हा इव्हेन्ट झाला आहे. त्यामुळे या भागात आखाड पार्ट्या चांगल्याच रंगू लागल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)