चाकणच्या तळेगाव चौकात भिकाऱ्यांचा सुळसुळाट

चाकण- पुणे-नाशिक महामार्गावरील तळेगाव चौकाच्या सिग्न्लवर प्रवासी वाहने थांबताच जीवाची पर्वा न करता भीक मागण्यासाठी आडवी तिडवी पळत असतात. कधी वाहनांना आडवे जाऊन तर कधी दुभाजकावरून पळत असतात, यातून मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. त्याचप्रमाणे येथील कोहिनुर सेंटरच्या पायऱ्यांवरही भिकारी महिला व लहान बालिका भीक मागत असल्याने या चौकात भिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशांसह स्थानिकांनी केली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही बाजूला प्रवाशांसाठी बसथांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये तिष्ठत उभे राहावे लागते. काही प्रवासी तर धोकादायकरीत्या महामार्गावरील दुभाजकांवर उभे राहून वाहनांची वाट पाहतात, त्यांच्यामुळे सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांनाही अडथळा होतो. अशावेळी जोरदार वेगाने आलेल्या वाहनांपासून अपघाताचा धोका होण्याचा संभव असतो. त्यातच तसेच तळेगाव चौकातील सिग्नल जवळ महामार्गावर भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुले व भिकारी वाहने थांबताच भीक मागण्यासाठी पळत सुटतात त्यामुळेही एखादा मोठा अपघात घडण्याची शक्‍यता असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • थांब्याचा वापर पथारी दुकानासाठी
    पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मजूर अड्ड्याजवळील बसथांबा गायब झाला असून नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहने सिग्नल जवळच थांबत असल्याने या रस्त्यावरील बसथांबा प्रवासी वापरात नाही. काही लोक या थांब्याचा वापर पथारी दुकानासारखा करीत आहेत. तळेगाव चौकातील पोलीस चौकी, मजूर अड्डा व नाशिक रस्त्यावर सवेरा हॉटेल समोर मोठ्या स्वरूपाचे बसथांबे उभेकरण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या रस्त्यावरील थांब्यावर कामगार व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. त्यातच सेवा रस्त्यावर टपऱ्या, हातगाड्या व अवैधवाहनांनी अतिक्रमण केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने येथील पोलीस चौकीजवळ थांबा उभारण्याची मागणी होत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)