चाकणच्या जनावरांच्या बाजारात 4 कोटींची उलाढाल

चाकण- येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरांच्या आवारात बकरी ईदनिमित्त बोकड व शेळ्या मेंढ्यांची आवक गेल्या शनिवारच्या तुलनेत वाढली. जनावरांच्या बाजारात सुमारे 3 कोटी, बैल बाजारात 1 कोटी अशी एकूण 4 कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती चंद्रकांत इंगवले, सचिव सतीश चांभारे यांनी दिली.
चाकण येथील जनावरांचा आठवडा बाजार संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या बाजारात बोकड,शेळ्या-मेंढ्या विक्री व खरेदी साठी धुळे, नंदुरबार, नाशिक, सिन्नर, इगतपुरी, गुजरात,राजस्थान, आदी ठिकाणावरून विक्रेते येतात तर मुंबई, पनवेल, खोपोली,
पिंपरी-चिंचवड, भोसरी, पुणे, कोल्हापूर, बेळगांव, निपाणी, हुबळी या ठिकाणाहून व्यापारी खरेदीसाठी येतात. मुस्लिम समाजात कपाळावरती चंद्राकृती आकार असणाऱ्या बोकडाला शुभ मानले जाते. त्यामुळे अशा बोकडांना जास्त किंमत मिळते. या बाजारात सुमारे 3500 बोकडांची आवक झाली त्यापैकी 2500 बोकडांची विक्री झाली. तर 4500 शेळ्या-मेंढ्यांची आवक होऊन त्यापैकी 3600 विक्री झाली. दहा हजार ते 75 हजार असा एका बोकडाला भाव तर पाच ते दहा हजार शेळ्या-मेंढ्यांना भाव मिळाला असल्याची माहिती सचिव सतीश चांभारे यांनी दिली


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)